Dharma Sangrah
✕

सोमनाथ अवघडे देणार १६ एप्रिलला 'फ्री हिट दणका'

Updated: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (14:13 IST)
 
यातच मराठी सिनेमा 'फ्री हिट दणका'ची देखील प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत 'फ्री हिट दणका'च्या टीमने हा सिनेमा १६ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या प्रेमाच्या महिन्याचे औचित्यसाधून या टीमने चित्रपटाच्या नायकाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. अपूर्वा एस.या अभिनेत्रींसोबत नायक म्हणून फेंड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडे दिसणार आहे. फेंड्री नंतर बऱ्याच दिवसांनी सोमनाथ अभिनय करताना दिसणार आहे. सोमनाथचा या सिनेमातला लुक पाहून आणि हातात बॅट पाहून हा सिनेमा क्रिकेटच्या अवती भवती फिरणारा तर नाहीना? आणि चित्रपटाच्या नावातूनही या चित्रपटाचा क्रिकेटशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मिळतील.मात्र सोमनाथच्या फॅन्ससाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. 
 
यापूर्वीच या सिनेमातील अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही हिट जोडी जाहीर करण्यात आली आहे. वॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या  सिनेमाच्या पोस्टरमध्ये सर्वत्र प्रेमाचाच रंग विखुरलेला आहे. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटा पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. 
 
एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांची असून चित्रपटाचे निर्माते अतुल रामचंद्र तरडे आणि आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे, आणि सुनिल मगरे हे आहेत. सहनिर्माता म्हणून नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी काम पाहिले 
आहे. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे.  सिनेमाला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटाचे छायाचित्रण हजरत शेख (वल्ली) यांचे आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच एकत्र; ‘कोण होणार करोडपती’च्या शुभारंभात उलगडणार खास किस्से

३९ वर्षांनंतर अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया 'नोटिस' या चित्रपटात एकत्र दिसणार

तुळजापूर, कोल्हापूर की माहूर? देवीदर्शनासाठी कोणते ठिकाण निवडाल?

शाहरुख खानला तुरुंगात जाण्याची वेळ आली, तेव्हा नाना पाटेकर यांनी केली होती मदत; जुना किस्सा पुन्हा चर्चेत!

हिवाळ्यात तुम्ही दक्षिण भारताला भेट देत असाल, तर हे साहसी उपक्रम नक्की करून पहा

पुढील लेख
Show comments