1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (14:54 IST)

अपूर्वा देणार 'फ्री हिट दणका'

एस.जी.एम फिल्म्स प्रदर्शित मैत्री आणि प्रेम या दोन एक सारख्यच तरीही वेगळ्या नात्यांची सांगड घालणारा 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या पोस्टरमधून चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींचे नाव उघड करण्यात आले आहे. या सिनेमात नायिकेच्या भूमिकेत अपूर्वा एस. दिसणार असून, सोबतच अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही हिट जोडी देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. 
 
अपूर्वाने 'यंटम' या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. 'फ्री हिट दणका' सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अपूर्वा मोठा पडदा गाजवायला सज्ज आहे. मैत्री आणि प्रेम यातली गंमत उलगडणारी तीन पात्र आपल्या समोर आली असली तरी चौथे पात्र म्हणजेच   चित्रपटाचा मुख्य अभिनेता कोण असणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. 
 
'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते अतुल रामचंद्र तरडे आणि आकाश बापू ठोंबरे, उमेश नारके, प्रसाद शेट्टी आणि सुनिल मगरे हे आहेत. सहनिर्माता म्हणून सुधाकर लोखंडे आणि नितीन बापू खरात यांनी काम पाहिले आहे. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे.  सिनेमाला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे आहे.