रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (15:22 IST)

अभिनेत्री सई लोकूर विवाह बंधनात

मराठी बिग बॉस फेम आणि अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून सईच्या  लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तीर्थदीप रॉय असे तिच्या जोडीदाराचे नाव आहे. मराठमोळ पद्धतीने सईने तीर्थदीपसोबत लगीनगाठ बांधली. सई आणि तीर्थदीप यांचा विवाहसोहळा बेळगावात पार पडला. नुकतेच लग्नाआधीचे देवकार्य पार पडले असून या कार्यक्रमाचे फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईने शेअर केलेल्या या फोटोत तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात  मोत्यांची माळ, कपाळावर चंद्रकोर असा छान मराठमोळा लूक सईने केला आहे.

सईने लग्नापूर्वीच्या अनेक विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सई आणि तीर्थदीपचा साखरपुडा 2 ऑक्टोबरला पार पडला होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे, असे कॅप्शन सईने साखरपुड्यातील फोटोंना दिले होते. त्यापूर्वी सईने प्रेमात पडल्याची कबुली देत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. मात्र, तिचा जोडीदार पाठोरा असल्याने, तो कोण असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.