ज्वेलरी निवडा हटके
लग्रसराईचे दिवस म्हणजे शॉपिंग आणि आणि आनंदाचे दिवस. या दिवसात नवनवीन ट्रेंडचा उदय होताना दिसतो. लग्रात मिरवू इच्छिणार्याव प्रत्येकीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. केवळ मेकअपच नव्हे तर अंगावरील प्रत्येक अॅजक्सेसरी उठून दिसणारी हवी, यासाठी प्रत्येक तरूणी आग्रही असते. लग्राच्या मुख्य समारंभाआधी हळद, मेंदी, संगीत अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. अशा कार्यक्रमांमध्ये फॅशनच्या वेगवेगळ्या टिप्स वापरून तुम्ही खास दिसू शकता...
* बांगड्या- लग्रातबांगड्यांचं स्थान जागा अढळ आहे. वधूच्या बांगड्यांचं महत्त्व तर त्याहूनही खास आहे. या बांगड्यांसोबतच तुम्ही गोठपट्टी लावलेल्या बांगड्याही घालू शकता. या बांगड्या फक्त वधूच नाही तर तिच्या मैत्रिणीही घालू शकतात. यामुळे भारदस्त आणि पारंपरिक लूक मिळतो.
* मेंदी- नववधूच्या हातावर समारंभपूर्वक मेंदी रेखली जाते. शुभशकुन समजली जाणारी मेंदी वधूच्या हातावर रेखली जाते. मेंदी समारंभासाठी ड्रेसचा पॅटर्न कोणताही निवडा, पण अशा वेळी फ्लोरल ज्वेलरी भाव खाऊन जाते यात शंका नाही. या प्रकारामध्ये इअररिंग, बाजूबंद, ब्रेसलेट, नेकलेस, मांग टिका अशा पद्धतीचे दागिने उपलब्ध असतात.
* संगीत- हा कार्यक्रम वरील कार्यक्रमांइतकाच खास असतो. संगीत किंवा डीजे कार्यक्रमांमध्ये पॉम-पॉम ज्वेलरी उठून दिसेल. पेहरावाला शोभेल अशी पॉम पॉम ज्वेलरी निवडा आणि हवाहवासा लूक मिळवा.
आरती देशपांडे