सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (08:25 IST)

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणार्‍या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर सोमवारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोंडकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ऊर्मिला या नावाजलेल्या अभिनेत्री असून अनेक हिट चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.
 
गेल्या लोकसभा निवडणुकीत ऊर्मिला यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र काँग्रेसच्याच काही नेत्यांनी आपल्याविरोधात काम केल्याने पराभव झाला, असा आरोप करून ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना, तसेच राज्य सरकारवर हल्लाबोल केला, तेव्हा ऊर्मिलाने सडेतोड प्रत्युत्तर देऊन राज्य सरकारची बाजू उचलून धरली होती.