सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (09:22 IST)

नजाकत वेडिंग गाउनची

विवाह समारंभातील वधूचा पेहराव हा तिच्या आयुष्यातला अत्यंत खास पेहराव असतो. लग्रसमारंभातील विविध विधींच्या निमित्ताने घातले जाणारे आणि स्वागत समारंभाच्या वेळी मिरवले जाणारे पेहराव खचितच आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणूनच अत्यंत चोखंदळपणे या पेहरावांची निवड केली जाते. ते जास्तीत जास्त सुंदर असावेत या हेतूने या खरेदीसाठी बराच वेळ घेतला जातो. आजकाल विवाह सोहळ्यांमध्ये पारंपरिक वेशभूषेबरोबरच वेडिंग गाउन्सनाही खास पसंती बघायला मिळत आहे. पूर्वी फक्त ख्रिश्चन वधूपुरता मर्यादित असणारा हा वधूवेश आता अन्य धर्मीय वधूंवरही भुरळ घालताना दिसत आहे. जाणून घेऊ या विविध प्रकारच्या वेडिंग गाउन्सविषयी...

* रॉयल ट्रेल गाउन- अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींच्या अंगावर आपण हा गाउन पाहिला आहे. रुपेरी पडावर अनेक अभिनेत्रींनी या प्रकारचे वेडिंग गाउन परिधान केले आहेत. सध्या तरूणींमध्ये या गाउनची क्रेझ दिसून येते. एखाद्या चांगल्या डिझायनरकडून बनवून घेतलेला हा गाउन तुम्हाला एक सुंदर वधू बनवू शकतो.

* बॉल गाउन- अभिनेत्री ऐश्वर्याने असा गाउन परिधान केल्यापासून प्रत्येक मुलीची पहिलीपसंती बनला आहे. बॉल गाउन तुम्हाला अत्यंत सुंदर दिसण्यास मदत करेल यात शंका नाही.
* प्रिंसेस गाउन- सध्या प्रिंसेस गाउन सर्वात जास्त मागणी आहे. स्ट्रेपलेस नेकलाइनच्या या गाउनमुळे बोल्ड आणि ब्युटीफूल दिसण्यास मदत होते.
* एंपायर गाउन- हा गाउन राजेशाही वधूचा फील देऊन जातो. स्लीव्हज आणि प्लगिंग नेकलाइन असणार्या गाउनचा हा प्रकार वधूच्या पेहरावाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
* मर्मेड गाउन- याला फिश कट गाउन असंही म्हणता येईल. वेडिंग गाउनमध्ये मॉडर्न टच हवा असेल तर मर्मेड गाउन हा सर्वोत्तम पर्याय आहे.
 स्वाती पेशवे