शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (16:50 IST)

वैवाहिक जीवनात रस नसल्याचे हे तर कारण नाही, बघा

असे म्हणतात की लग्नगाठी वरून जुळून येतात. आणि इथे त्यांना एक घट्ट अश्या नात्यात बांधतात. ज्याला आपण वैवाहिक जीवन असे म्हणतो. आणि हे घट्ट नातं असत ते नवरा बायकोचं. आपापल्या सुख दुःखाचा वाटा साचवून ठेवणारं, एकमेकांना जपणारं असे हे नवरा बायकोच नातं असतं. सुखी आणि आनंदी असे वैवाहिक जीवन कोणाला आवडत नाही. परंतु सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढतंच चालले आहे. सध्याच्या आधुनिक काळात शुल्लक कारणांवरून वितंडवाद होतो आणि तो घटस्फोटावर जाऊन थांबतो. असे होऊ नये. वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी या काही लहान -लहान गोष्टींना लक्षात घेणं आवश्यक असतं. 
 
वैवाहिक जीवन जेवढं बळकट असतं तेवढंच नाजूक देखील असतं. त्याला जपून ठेवणं गरजेचं असतं. वैवाहिक जीवनात लहान-सहान गोष्टींची काळजी न घेतल्यानं नात्यात दुरावा येऊ लागतो. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टींची काळजी न घेतल्यानं नात्यात दुरावा वाढतो. नवरा-बायकोचं नातं घट्ट असावं आणि नात्यात कोणत्याही अडचणी येऊ देऊ नका. 
 
* संवादाचा अभाव - 
वैवाहिक जीवनात संवादाच्या अभावामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो. नवरा-बायकोमध्ये संवादाचा अभाव नसावा. नात्यात संवादाच्या अभावामुळे नातं कमकुवत होऊ लागतं. जर का आपणास आपल्या नात्याला अधिक घट्ट करावयाचे असल्यास संवादाचा अभाव होऊ देऊ नका. एकमेकांशी मन मोकळं करून संवाद साधा.
 
* गोष्टी सामायिक न केल्यानं -
वैवाहिक जीवनात एकमेकांशी गोष्टी सामायिक न केल्यानं देखील नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा वाढतो. आपल्या वैवाहिक जीवनाला बळकट करण्यासाठी नवरा-बायकोने एकमेकांशी सर्व गोष्टी सामायिक कराव्यात. यामुळे आपापसातील संवाद वाढतो आणि सर्व गोष्टींना सामायिक केल्यानं नातं घट्ट होतं.
 
* राग केल्यानं - 
वैवाहिक जीवनात रुसवे-फुगवे तर होतातच, त्याशिवाय त्याला रस येत नाही. पण जर का हा राग किंवा रुसवे-फुगवे विकोपाला गेल्यानं नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा की रागाचा भरात येऊन आपण आपल्या जोडीदाराशी असे काहीही बोलू नये, ज्यामुळे तो किंवा ती आपल्यावर रागावेल. आणि त्यामुळे नात्यात दुरावा येईल.
 
* अविश्वास दाखवणं - 
विश्वास हा कोणत्याही नात्याला घट्ट करण्यासाठी पुरेसा आहे. पण आपले एकमेकांवर विश्वासच नसेल तर नात्यात दुरावा येणं सहजच आहे. त्यामुळे आपल्यातील संबंध तुटू देखील शकतात. आपल्या वैवाहिक जीवनाला बळकट आणि सुदृढ करण्यासाठी नवरा - बायकोचा एकमेकांवर विश्वास असायलाच हवा.