1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (14:34 IST)

दुःख वाळुवर लिहायला शिकावे आणि चांगुलपणा दगडावर कोरायला!

motivation story of life
एकदा दोन मित्र वाळवंटातुन प्रवास करत असतात. प्रवास करत असताना एकदा त्यांच्यात काही कारणावरुन विवाद होतो. यामध्ये एक मित्र दुसऱ्याच्या थोबाडीत मारतो. मार खाल्लेला मित्र दुःखी होतो पण काहीही न बोलता तो वाळुमध्ये लिहितो, "आज माझ्या जिवलग मित्राने मला थोबाडीत मारले."
 
प्रवास करत करत ते पुढे जातच राहतात. त्यांना समुद्र लागतो. समुद्र बघुन ते त्यात स्नान करायचे ठरवतात. पण  मार खाल्लेला मित्र पाण्याच्या भोवऱ्यात अडकतो आणि बुडायला लागतो पण त्याचा मित्र त्याला वाचवतो. या प्रसंगातुन सावरल्यावर काही दिवसांनी तो दगडावर काही अक्षरे कोरतो.  "आज माझ्या जिवलग मित्राने माझे आयुष्य वाचवले." 
 
ज्याने त्याला मारले व वाचवले असते असा जिवलग मित्र त्याला विचारतो, "मी तुला दुःखी केल्यावर तु वाळुवर लिहिलेस आणि आता दगडावर कोरलेस असे का?"
 
मित्र उत्तरतो- 
"जेव्हा आपल्याला कोणी दुःखी करते तेव्हा ते वाळुवर लिहावे कारण क्षमेचा वाऱ्याने ते आपोआप पुसले जाते पण जर कोणी आपल्यासाठी चांगले केले तर आपण दगडावर कोरुन ठेवावे जेणे करुन कुठलाच वारा ते नष्ट करु शकणार नाही."