शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2020 (07:44 IST)

राग नाहीसा होईल, जाणून घ्या कामाच्या 7 टिप्स

राग येणे प्रत्येकासाठी एक गंभीर समस्या आहे. कोणाला राग येणे ही समस्या आहे तर कोणाला राग सहन होत नसल्याची समस्या आहे. आपल्याला देखील लगेच राग येत असल्यास आणि आपण या सवयी पासून कंटाळला आहात, तर आम्ही आपल्याला या सवयींपासून मुक्त होण्यासाठीचे काही सोप्या टिप्स सांगत आहोत - 
 
1 रागाचे महत्वपूर्ण कारण आहे ताण, म्हणून ह्याला शांत करण्याचा सरळ आणि सोपी पद्धत आहे की आपल्या स्नायूंना आराम देणे. दीर्घ श्वास घेणे आणि किमान 2 मिनिट तरी शांत राहणे, काही काळाने आपणास लक्षात येईल की आपण शांत होत आहात.
 
2 आपले डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. असा विचार करा की ताण आपल्यापासून लांब जात आहे. जसं जसं आपण विचार कराल की ताण आपल्या पासून लांब जात आहे आपल्याला आढळून येईल की खरंच ताण आपल्यापासून लांब जात आहे आणि आपले मन शांत होत आहे.
 
3 जरी आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की पण आपण रागाच्या भरात किंवा ताण असल्यास, एखादा चांगला सुवास घ्या, आपण एखाद्या अत्तराचा किंवा डियोचा किंवा ताज्या फुलांचा सुवास घ्या काहीच क्षणात आपला ताण आणि राग पळून निघेल.
 
4 राग कमी करायला थंड पाणी पिणे आणि उलटे आकडे मोजणे ही जुनी पद्दत आहे. जी प्रभावी आहे. या व्यतिरिक्त आपण सकारात्मक विचारांना अवलंबवून आपल्या मनाला सहजरित्या शांत ठेवू शकता.
 
5 विनोदी वाचन करणे, बघणे किंवा ऐकणे, याने आपला राग नाहीसा होऊन आपल्याला हसविण्यात मदत करेल. म्हणून विनोदाला आपल्या जीवनाचा एक भाग करा आणि आनंदी राहा.
 
6 पायी चालणे, व्यायाम करणे किंवा योगा करणं कोणत्याही पद्धतीने शारीरिक व्यायामामुळे आपण ताणतणाव आणि रागांपासून दूर होऊ शकता. म्हणून ह्यांना आपल्या जीवनात समाविष्ट करावं.
 
7 मेडिटेशन म्हणजे ध्यान, तणावमुक्त राहण्यासाठी आणि मनाच्या शांतीसाठी एक उत्तम टॉनिक प्रमाणे काम करतं आणि मानसिक क्षमता वाढवतं.