शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (16:35 IST)

तृप्ती देसाई इंदूरीकरांविरोधात तक्रार देणार

इंदुरीकर महाराजांविरोधात नगरमध्ये तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. त्यातच उद्या तृप्ती देसाईही इंदूरीकरांविरोधात तक्रार द्यायला नगरमध्ये जाणार आहेत. 
 
इंदूरीकर महाराजांविरोधात तृप्ती देसाईंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्याही मंगळवारी नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी इंदुरीकर समर्थकांनीही चलो नगर अशी मोहीम हाती घेतली आहे. बीडमध्ये इंदूरीकर महाराजांचं रविवारी कीर्तन झालं, त्याही वेळी त्यांचं जंगी स्वागत झालं आणि कीर्तनात आय सपोर्ट इंदुरीकर असे बोर्डही झळकले. पण मोर्चा, निषेध आंदोलनं करू नका, असं पत्र इंदुरीकरांनी समर्थकांना लिहिलंय. दुसरीकडे भाजपनंही या वादात उडी घेतली आहे.