मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (11:37 IST)

खिशाला परवडणारा स्वस्त आयफोन मार्चमध्ये होणार लाँच

अॅपल कंपनीचा स्वस्तातील फोन असल्याचा दावा होत असलेल्या iPhone SE2 चे अनेक खास वैशिष्ट्ये लिक झाली आहेत. या फोनचे नाव iPhone 9 असे ही असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
रिपोर्ट्सप्रमाणे या फोनमध्ये 4.7 इंचाचा LCD डिस्प्ले, टच ID, होम बटन आणि अती स्लीम बेजल्स असल्याची शक्यता आहे. यात 3.5 MM हेडफोन जॅक नसणा.
 
आयफोन 9 मध्ये A13 Bionic चिप दिली जाणार असून हा कंपनीच्या लेटेस्ट iOS 13 वर चालणार आहे. 
 
हा फोन मार्च मध्ये लाँच होण्याची शक्यता असून फोनची किंमत 28 हजार रुपये असू शकते. अॅपल अनालिस्टनुसार iPhone SE 2 ची डिझाइन iPhone 8 सारखी असून  4.7 इंचाची स्क्रीन साइज असलं तरी 5.4 इंचमध्येही उतरवले जाऊ शकते.
 
या फोनविषयी कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.