शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (12:15 IST)

Oppo Reno 3, लाँचिंग पूर्वीच 5 लाखहून अधिक बुकिंग

चीनची स्मार्टफोन कंपनी Oppo आज बहुप्रतीक्षित Oppo Reno 3 सिरीज लाँच करत आहे. Oppo Reno 3 सोबतच कंपनी Oppo Reno 3 Pro ही लाँच करत आहे. Oppo Reno 3 आणि Pro व्हेरियंट हे ड्युल बँड 5G कनेक्टीव्हिटीसोबत येणार आहेत. या सिरीजमध्ये क्वॉड कॅम सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ColorOS 7 स्किन आउट-ऑफ-द-बॉक्स दिला जाणार आहे. 
 
या फोनसाठी ग्राहक किती उत्सुक आहेत हे बुकिंगवरुन अंदाज लावता येऊ शकतो. सीरीजच्या लाँचिंगआधीच बुकिंग 5 लाखाचा आकडा पार झालेला आहे. फोनच्या कलर आणि मेमरी वेरियंट्सची माहिती साझा केलेली नसली तरी ग्राहकांचा उत्साह बघण्यासारखा आहे.
 
Oppo Reno 3 Pro संभावित फीचर
6.5 इंची फुल HD+AMOLED डिस्प्ले, 90 Hz रिफ्रेश रेटसह
128 आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन
रिअर पॅनलवर मेन कॅमेरा सेंसर 60 मेगापिक्सलचा
बाकीचे तीन कॅमेरे 13 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे
सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा