सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (10:57 IST)

काय म्हणता, स्वस्तात अॅपलच्या मोबाईल फोन

अॅपलच्या प्रत्येक फोनची किंमतही सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. मात्र आता आयफोन सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनचे नाव iPhone 9 असं आहे. 
 
iPhone 9 चे डिव्हाईस iPhone 8 प्रमाणे आहे. तसेच इंटरनल डिझाईन iPhone 11 सारखी असू शकते. डिझाईनमुळे या फोनचे नाव iPhone 9 ठेवण्यात आले आहे, असं सांगितलं जात आहे. 
 
iPhone 9 ला 2020 मध्ये जानेवारी ते मार्चच्या दरम्यान लाँच केले जाऊ शकते. या फोनची किंमत 399 डॉलर (भारतीय रुपयात 28 हजार) आहे. सर्वात स्वस्त फोन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक हा फोन खरेदी करतील अशी शक्यता आहे. 
 
नवीन आयफोन 8 प्रमाणे 4.7 इंचाचा LCD डिस्प्ले, Touch ID ने होम बटन iPhone 9 ला दिले आहे. यामध्ये 3.5mm हेडफोन जॅक नसेल. iPhone 9, A13 बायॉनिक चीपसेटवर चालणार आहे. सध्याचा iPhone 11 मध्येही या चीपचा वापर करण्यात आला आहे. iPhone 9 लेटेस्ट iOS 13 वर ऑपरेट होतो. iPhone 9 फोनच्या स्टोअरेजमध्ये 3GB रॅम दिलेली आहे. यासोबत फोनमध्ये इंटरनल स्टोअरेजचे दोन व्हेरिअंट 64GB आणि 128GB चे असतील.