शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By

Samsung Galaxy S10 Lite चे प्री-बुकिंग जोरात सुरू

Samsung Galaxy S10 Lite हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनसाठी  फ्लिपकार्ट आणि Samsung.com वर प्री-बुकिंगलाही सुरूवात झाली असून तीन फेब्रुवारीपर्यंत बुकिंग करता येईल. मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये ‘सुपर स्टेडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजीसह आलेला हा भारतातील पहिलाच फोन असल्याचं कंपनीने म्हटलंय. या  स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. 
 
प्री-बुकिंग ऑफरअंतर्गत युजर्सना 1,999 रुपयांमध्ये वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट फायदा मिळेल. लॉंच ऑफरअंतर्गत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 3,000 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे.
 
स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज मेमरी 1TB पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फुल HD+ सुपर AMOLED Infintiy-O डिस्प्ले आहे. याशिवाय यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टा-कोर प्रोसेसर असून 25W सुपर फास्ट चार्जरसह 4,500 mAh क्षमतेची बॅटरी दिलीये. अवघ्या 30 मिनिटांच्या सुपर फास्ट चार्जिंगनंतर फोनची बॅटरी दिवसभर टिकते असा कंपनीने दावा केला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये ऑन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे.
 
स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. म्हणजे फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेरे असून यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.