शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 14 डिसेंबर 2019 (14:39 IST)

अ‍ॅपल वर्षातून दोनदा iPhone लाँच करणार

स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्यामुळं अ‍ॅपलनं स्मार्टफोन लाँचिंगच्या धोरणात बदल करण्याचा विचार केला आहे. रिपोर्टनुसार, 2021 पासून अ‍ॅपल कंपनी वर्षातून दोन वेळा आयफोन लाँच करणार आहे. बदलत्या धोरणामुळं दरवर्षी दोन लाँचिंग सोहळे आयोजित करणे कंपनीसाठी सोपे ठरेल. प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यात कंपनी यशस्वी ठरेल, असं मानलं जात आहे.
 
मोबाइल हार्डवेअरच्या माध्यमातून कमाई- वर्षात दोन वेळा आयफोन लाँच केल्यानं अ‍ॅपलला महसुलाच्या बाबतीत हुवावे, सॅमसंग आदी कंपन्यांच्या आसपास पोहचण्यास मदत होईल. लाँचिंग धोरणाच्या बाबतीत म्हणाल तर, अ‍ॅपल या कंपन्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. वर्षात केवळ एकच नव्या सीरिजमधील फोन लाँच करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. अ‍ॅपल हे बजेटमधील स्मार्टफोन विक्री करत नाही. अशा वेळी मोबाइल हार्डवेअर हाच कंपनीच्या महसुलाचा मुख्य स्त्रोत आहे.
 
नव्या स्मार्टफोनमध्ये 5 जी- जे. पी. मॉर्गनचे प्रॉडक्ट अ‍ॅनालिस्ट्‌सनं यासंदर्भात सीएनबीसीला माहिती दिली. 2021 या वर्षात अ‍ॅपल चार नवीन आयफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हे सर्व फोन ओएलईडी आणि फाइव्ह जी नेटवर्क सपोर्टसह बाजारात येतील. यातील काही फोनमध्ये mmWave टेक्नॉलॉजी सपोर्ट करणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली. 
 
खास तंत्रज्ञान- 2021मध्ये अ‍ॅपल एक 5.4 इंच, दोन 6.1 इंच आणि एक 6.7 इंच डिस्प्लेचे आयफोन लाँच करणची शक्ता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नव्या आयफोनच्या प्रीमिअम व्हेरियंटमध्ये mmWave फाइव्ह सपोर्टसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि खास वर्ल्ड फेसिंग थ्रीडी सेन्सिंग असेल. अन्य फोनमध्ये ड्यूएल रिअर कॅमेरा असेल.