मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Updated : शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:52 IST)

#Budget2020 शेतकऱ्यांसाठी काय?

अर्थसंकल्प प्रस्तुत करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. कृषि आणि सिंचन क्षेत्रासाठी 2.83 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
शेतकर्‍यांसाठी एक नवी योजना म्हणजे रेल्वे. आता शेतकऱ्यांना आपला नाशवंत माल रेल्वेच्या एसी डब्यातून नेता येईल. रेल्वेद्वारे शेती माल वाहतुकीसाठी विशेष एसी डबा दिला जाणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा माल लवकर खराब होणार नाही आणि मालाला चांगला भावही मिळेल. या योजनेमुळे डेअरी प्रॉडक्ट्स तसेच भाज्या-फळे यांच्या वाहतुकीसाठी फायदा होईल.
 
या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी केल्या गेलेल्या घोषणांकडे एक नजर टाकू या-
 
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
शेतकऱ्यांसाठी 6.11 कोटी विमा योजना
झिरो बजेट नॅच्युरल फार्मिंगवर भर देणार. 
कृषी आणि संलग्न उपक्रम, सिंचन, ग्रामीण विकास क्षेत्रासाठी 2020-21 वर्षासाठी 2.83 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले
देशभरात शेतकऱ्यांनासाठी शीतगृहांची साखळी तयार केली जाईल. यासाठी भारतीय रेल्वे ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप’ (PPP) शेतकरी रेल्वे तयार करेल. त्याचा उपयोग करुन लवकर खराब होणारा माल तात्काळ पाठवता येईल. 
ही ‘कृषी उडाण’ योजना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरही तयार केली जाईल.
जलसंकटात असलेल्या 100 जिल्ह्यांना सहाय्य देणार.
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उथ्थान महाभियान’ (PM KUSUM) या पुढील काळात 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल. या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप दिले जातील.
मत्यपालनासाठी नवी योजना आणणार. 2 कोटी टन उत्पादनाचे लक्ष्य
शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय फॉर्म्युला
शेतजमिनीचा चांगला वापर करून अधिक उत्पन्न कसं घेता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.
आधुनिक शेतजमीन कायदा राज्य सरकारद्वारे लागू करणे
100 जिल्ह्यात पाण्यासाठी मोठी योजना आणणार, त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध होईल
पंतप्रधान कुसूम योजनेअंतर्गत कृषी पंपांना सौर ऊर्जेशी जोडणार. यामध्ये 20 लाख शेतकऱ्यांचा समावेश असेल, 15 लाख शेतकऱ्यांच्या ग्रीड पंपांना सौर ऊर्जेशी जोडणार
आमचं सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटीबद्ध आहे. शेती व्यवसायाला स्पर्धात्मक बनवत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित केलं जाईल असे अर्थमंत्री  निर्मला सीतारमण यांनी सांगितले.