शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Modified: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (10:30 IST)

Budget 2020: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण

आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. 
 
देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची मंदगती पाहता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, शेअर बाजारावरही याचे सावट असून अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार सुरु होतानाच घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 140 अंकांनी कोसळला असून निफ्टीची 126.50 अंकांची घसरण झाली आहे.
 
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसते. मोदी सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आजवरच्या ६ अर्थसंकल्पांपैकी ४ वेळा शेअर बाजारात घसरण झालेली पहायला मिळाली आहे.