शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (18:03 IST)

बजेट मधील तीन मूलभूत संकल्पना

1. Receipts: यात सरकारला कुठून किती पैसे मिळणार आहेत त्याचा उल्लेख केलेला असतो. मिळणारे पैसे दोन प्रकारात विभागले जातात.
 
Revenue Receipts
Capital Receipts
 
 
Revenue Receipts म्हणजे ज्यात आयकर, तसेच वस्तू आणि सेवा (GST) सामील असतात. या व्यतिरिक्त सरकारी मालकीच्या कंपन्यांकडून नफ्यामधून सरकारला मिळणारे लाभांश तसेच 
 
फॉरेन एड. 
 
Capital Receipts मध्ये जेव्हा उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशांतून गरजा पूर्ण होऊ शकत नाही तेव्हा कर्ज घ्यावे लागते किंवा आपली मालमत्ता विकावी लागते. अशात कर्ज घेऊन सरकारला जे 
 
पैसे मिळतात ते भांडवल प्राप्ती. Disinvestment Receipts म्हणजे सरकार स्वतःची मालमत्ता विकते. 
 
2. Expenditure: यात सरकार कोणत्या प्रकल्पावर किती खर्च करणार आहे त्याचे विवरण असते. खर्चाचे ही दोन प्रकार असतात.
 
महसूल खर्च ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती पेन्शन, वेगवेगले अनुदान उदा. ह्यांचा समावेश होतो.
भांडवल खर्च ह्यात सरकार मालमत्ता बनवण्यासाठी पैसे खर्च करते.
 
3. Deficit
उत्पन्न तेवढाच खर्च असेल तर हे संतुलित बजेट. प्राप्ती खर्चापेक्षा जास्त असतात तर शिल्लक किंवा अतिरिक्त बजेट आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर तूट बजेट. 
तुटीचे प्रकार-
महसूल तूट, भांडवल तूट, वित्तीय तूट, वित्तीय तूट