रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:19 IST)

बजेटच्या आधी हलवा का तयार होतो?

येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी दिल्लीतील अर्थमंत्रालयात हलवा तयार करून अर्थसंकल्पाच्या छपाईचा श्रीगणेशा करण्यात आला.
 
दर वर्षी हलवा बनवण्याची परंपरा असून त्यानंतरच संसदेत बजेट प्रस्तुत केलं जातं. यावेळी अर्थमंत्री हा हलवा आपल्या विभाग वाटतात. यानंतरच अधिकृत रीत्या बजेट छपाईसाठी पाठवण्यात येतं. 
 
हलवा सेरेमनी बजेट येण्याच्या दहा दिवस आधी साजरी होते. गेली अनेक वर्ष अर्थ मंत्रालयाकडून हा रिवाज पाळला जात आहे. यात एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री, अर्थ सचिव यांच्या उपस्थित सर्वांचे हलव्याने तोंड गोड करून अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जाते. कोणत्याही महत्वाच्या कामाची सुरुवात ही गोडधोड करून करावी, अशी भारतीय संस्कृती आहे. त्यानुसार अर्थ मंत्रालयाकडून हा रिवाज पाळण्यात येतो. भारतीय संस्कृती हलवा शुभ मानला गेला आहे.
 
यंदा सीतारामन दुसऱ्यांदा बजेट सादर करतील. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार असून ते 11 फेब्रुवारीपर्यंत चालू राहील. दुसऱ्या टप्प्यात 2 मार्च ते 3 एप्रिल या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा असेल.
 
हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये अर्थसंकल्पाची छपाई केली जाते. ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्थ मंत्रालयात इतरांना प्रवेश दिला जात नाही. हलवा वाटप झाल्यावर अर्थ मंत्रालयाच्या अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मंत्रालयातून बाहेर पडता येत नाही. त्यांना पूर्ण दुनियेपासून वेगळं राहवं लागतं. हे कर्मचारी बजेटची प्रिंटिंग करतात. बजेट छपाई प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते बजेट संसदेत प्रस्तुत होयपर्यंत यांना कोणाशीही संपर्क करण्याची परवानगी नसते. त्यांना फोन करण्याची देखील परवानगी नसते. कोणालाही त्यांची भेट घेता येत नाही.