रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (12:54 IST)

हलवा वितरण समारंभासह बजेट दस्तऐवजांचे प्रकाशन सुरू झाले

सोमवारी अर्थ मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी पारंपरिक हलवा समारंभासह बजेट दस्तऐवजांच्या प्रकाशन प्रक्रियेचा शुभारंभ केला. या दरम्यान राज्य अर्थमंत्री शिव प्रताप शुक्ला, अर्थ सचिव सुभाष गर्ग आणि सडक परिवहन व राजमार्ग राज्यमंत्री पी. राधाकृष्णानं उपस्थित होते. सर्वांनी हलवा खिलवून एकमेकांना अभिनंदन दिलं. बजेट प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आता बजेट सादर होईपर्यंत मंत्रालयामध्येच थांबतील. या दरम्यान त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधता येणार नाही. मंत्रालयाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
 
* काय आहे हलवा ?
 
बजेट पूर्ण करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात शिरा बनविला जातो. ही परंपरा बऱ्याच काळापासून चालू आहे. हलवा समारंभ साजरा करण्याचा मुख्य कारण म्हणजे, शुभ कार्याची सुरुवात मधुरपणाने करावी.
 
* यावेळी देखील जेटली बजेट सादर करतील: अहवाल
 
अर्थमंत्री अरुण जेटली सध्या उपचारासाठी यूएसमध्ये आहे. म्हणून हलवा समारंभाच्या काळात ते उपस्थित नव्हते. गेल्या आठवड्यात अर्थमंत्रींच्या यूएस जाण्यामुळे अशी शंका वाटत होती की बहुतेक बजेट सादर होईपर्यंत ते भारतात येऊ शकणार नाही. परंतु, मीडिया अहवालात म्हटलं जात आहे की 1 फेब्रुवारी रोजी जेटलीच बजेट
सादर करणार आहे.