शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (14:37 IST)

Lockdown च्या काळाचा सदुपयोग करा, एकमेकांना समजून घ्या

आपण कुटुंबात राहत असला वा दोघंच, या वेळी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी करमणूकची गरज आहे. कोरोनाचा काळ परीक्षेचा काळ म्हणू शकतो. अश्या वेळी एकमेकांना आनंदी आणि सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. 
 
आपण चीनबद्दल बोलू या तर सध्याच्या काळात चीनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त वाढले आहेत. ही काळजीची बाब असू शकते. पण या गोष्टीला समजून घ्या की काही वेळा ताण एक उज्ज्वल पक्ष देखील घेऊन येतं. प्रत्येक वाईट परिस्थितीत काही न काही चांगलं असतंच. जेव्हा आपण कोरोना सारख्या महामारीचा नायनाट करण्यासाठी आपल्या घरात आपल्या लोकांबरोबर बंदिस्त आहात, तर ही वेळ आपापसातील अंतर कमी करण्याची आहे.
 
लग्नानंतरच्या नात्यात आलेल्या दुरावा कमी करण्यासाठीचा हा महत्त्वाचा काळ आहे. जर का आपल्यामध्ये बारीक सारीक गोष्टींवरून भांडण होत असल्यास, रुसवेफुगवे होत असल्यास तर ही वेळ ते कमी करण्याची आहे. आपल्या नात्यातल्या दरी भरून काढण्याची ही वेळ आहे.
 
आपण कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक पैलू बघितल्यावर लक्षात येते की आता आमच्या कडे पुरेसा वेळ नाही अश्या तक्रारी करायला जागाच उरली नाही. हीच वेळ आपल्या नात्याला घट्ट करण्याची आहे. आपल्या नात्याला पुन्हा जोडून त्याला जिवंत करण्याची.
 
आपल्या नात्यात कोणत्या कारणामुळे दुरावा आला, कोणत्या गोष्टींमुळे नाराजी होती त्याचे कारणं शोधा आणि त्या कारणांना आपल्या मधून काढून टाका आणि आपल्या नात्याला घट्ट करण्याचा विचार करा आणि या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या.
 
चला तर मग जाणून घेऊया काही खास गोष्टी जे आपल्या कामी येऊ शकतात.
 
एकत्र काम करावं : 
वेग वेगळे काम करण्यापेक्षा एकत्रच काम करा, जसे घराच्या कामाची विभागणी करा. स्वयंपाक करण्यासारख्या काम एकत्ररीत्या करा. बरोबरच जेवण करा. आपल्या दैनंदिन कामाला आनंदी बनवा. प्रत्येक गोष्टींची तक्रार करणे थांबवा. कामाच्या वेळी थोडी मजा करा. असे केल्याने मजेशीर काम होईल आणि नात्यात गोडवा वाढेल.
 
आपल्या आतील लहानपणा शोधा : 
या वेळेला मनोरंजक बनवा. आपल्या जुन्या काळातील आठवणींना उजाळा द्या. कुटुंबातील सदस्य मिळून काही बोर्ड गेम खेळा. आपल्या मूड चांगला करण्यासाठी ही चांगली सुरुवात आहे. आपली सृजनशीलता वापरून आपण घरी असलेल्या वस्तू पासून काही आर्ट क्राफ्ट सुरू करू शकता आणि अतिशय गोड आणि सुंदर आठवणी तयार करू शकता.
 
चांगल्या काळाला लक्षात ठेवा: 
आपल्या जोडीदारासह आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्या. या गोष्टी आनंद देतात. आपण आपल्या पहिला वेळेच्या भेटीबद्दल देखील बोलू शकता.
 
एकत्र व्यायाम करा : 
निरोगी जीवनशैलीसह व्यायाम करणे आवश्यक आहे. या साठी आपण आपल्या जोडीदारासह व्यायाम आणि योगाला आपल्या नित्यक्रम मध्ये सामील करा. एकत्र किमान 20 मिनिटे व्यायाम केलाच पाहिजे.
 
बोलून कडूपणा कमी करा : 
कुठल्या गोष्टीवर नाराज असाल तर रुसवे फुगवे करण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या आणि बोलून समस्येचे निराकरण करा.