बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (16:36 IST)

अयोध्येत खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले

अयोध्येत राम मंदिराचे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमार्फत काम सुरू असताना काही ऐतिहासिक अवशेष सापडले आहे. या अवशेषांमध्ये अनेक पुरातत्व शिल्पांचे खांब व शिवलिंग आहेत. अमलक, कलश यांचाही समावेश आहे.
 
दरम्यान, या जन्मभूमी परिसरात राम मंदिर बांधण्यासाठी जमिन सपाटीकरणाचे काम जोरात सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टेन्सिंग पाळत या ठिकाणी काम सुरू असताना हे ऐतिहासिक अवशेष जमिनीचे खोदकाम करताना सापडले आहे. खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. दहा दिवसांपासून काम सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्या असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितलं.
 
”मागील दहा दिवसांपासून मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचे अवशेष सापडले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे,” अशी माहितीही राय यांनी दिली.