मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (14:14 IST)

हवाई प्रवाश्यांसाठी Aarogya Setu App अनिवार्य आहे, फक्त ग्रीन स्टेटस असलेल्यांनाच प्रवेश मिळेल

कोरोना विषाणूमुळे भारतात लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीत रेल्वे सुरू झाल्यानंतर आता भारत सरकारने 25 मेपासून देशांतरागत उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला ध्यानात घेऊन विमानतळ प्राधिकरणाने भारतीय आरोग्य सेतू मोबाईल अॅप हवाई प्रवाशांसाठी बंधनकारक केले आहे. याव्यतिरिक्त, विमानतळ परिसरात हवाई प्रवाशांनी मास्क आणि ग्लोव्ह्ज घातले पाहिजेत. विमानतळ परिसरात प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही होणार आहे.
 
 
भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे की सर्व प्रवाशांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू एप असले पाहिजे आणि सीआयएसएफचे अधिकारी आणि विमानतळ कर्मचारी एंट्री गेटवर याची तपासणी करतील. यासह आरोग्य सेतू मोबाईल एपामध्ये ज्यांचा ग्रीन स्टेटस नाही अशा प्रवाशांना विमानतळावर प्रवेश करता येणार नाही. तथापि, आरोग्य सेतू मोबाइल अॅप 14 वर्षाखालील मुलांसाठी अनिवार्य नाही.
 
हवाई प्रवाशांनी गाइडलाइनचे अनुसरणं केले पाहिजे
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी एक नवीन गाइडलाइन तयार केले आहे, त्याअंतर्गत हवाई प्रवाशाने विमानाने उड्डाण करण्याच्या 2 तास आधी विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. परंतु केवळ त्या प्रवाशांना विमानतळ परिसरात प्रवेश देण्यात येईल, ज्यांची उड्डाण पुढील चार तासांत होईल. दुसरीकडे, प्रवाशांना विमानतळावर सोशल डिस्टेंसिंग देखील पाळावे लागेल.
 
जिओफोन वापरकर्त्यांना मिळाला आरोग्य सेतू मोबाइल अॅप  
मिनिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजीने नुकतेच आरोग्य सेतू मोबाईल 50 लाख जिओ फोन वापरकर्त्यांसाठी जारी केले. त्याचबरोबर मंत्रालयाने म्हटले आहे की आता कोरोना संसर्गाचा ट्रेक करणे खूप सोपे होईल. यापूर्वी भारत सरकारने फीचर फोन आणि लँडलाईन वापरकर्त्यांसाठी आरोग्य सेतू IVRS सेवा सुरू केली होती.