मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : बुधवार, 20 मे 2020 (11:22 IST)

घरातील या वस्तू नियमितपणे स्वच्छ करा अन्यथा आरोग्यासाठी ठरेल नुकसानदायक

सध्याच्या काळात कोरोनाच्या विषाणूंमुळे जी परिस्थिती आहे, ते लक्षात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. तसं तर दररोजच लोकं आपल्या घराला स्वच्छ करतात. पण अश्या काही वस्तू आहेत ज्यांना दररोज स्वच्छ करण्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. पण जर का आपणं या वस्तूंना स्वच्छ करायला विसरलात तर त्यांचा वापर केल्यामुळे घरातील सदस्यांना धोका होऊ शकतो. कारण आपणं दररोज या वस्तूंचा वापर करीत असतो. त्यामुळे या वस्तू व्हायरसला पसरविण्याचे कारणीभूत ठरू शकतात. काही महत्त्वाच्या काळजी घेण्यासारख्या गोष्टी
 
1 घरातील मुख्य दार : 
घरातील मुख्य दार दररोज स्वच्छ करायला हवं. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा तर येतेच त्याच बरोबर संक्रमणाचा धोका कमी होतो.
 
2 डिश टॉवेल : 
ज्या रुमालाने आपणं घरातील सर्व भांडी पुसण्याचे काम करता त्याला डिश टॉवेल असे म्हटलं जातं. त्याला देखील दररोज स्वच्छ करणे गरजेचं असत. नाही तर घाणेरड्या टॉवेलचा वापर केल्याने भांडी स्वच्छ होण्याऐवजी अजून घाण होतील, आणि आजार पसरण्याचा धोका वाढू शकतो. 
 
3 सिंक : 
स्वयंपाकघर आणि स्नानगृहाचे सिकं हे असे ठिकाण आहते जिथे सर्वात जास्त घाण पसरण्याची शक्यता असते. स्वयंपाक घरात आणि स्नानगृहात लागलेल्या सिंकला नियमाने चांगल्या अँटी-बॅक्टेरियल लिक्विडने स्वच्छ करावं.
 
4 रिमोट कंट्रोल : 
रिमोट कुठलेही असो, टीव्हीचे किंवा एसीचे. बरेच जण त्याला हाताळतात. अनेकदा जेवताना देखील त्याच हाताने रिमोट वापरण्यात येतो ज्यामुळे त्यावर घाण साचते. 
 
5 आपलं पर्स : 
बायका आपल्या पर्समध्ये बऱ्याच वस्तू ठेवतात, दिवसभर त्या पर्सला आपल्या बरोबरच बाळगतात. त्यामुळे पर्स कुठेही ठेवावी लागते. जेणे करून पर्स खालून घाण होते. अश्या घाण झालेल्या पर्सला आपणं आपल्या घरात कुठेही ठेवलं तर संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यासाठी आपली पर्सला खालून आणि बाहेरून स्वच्छ ठेवावी.
 
6 लॅपटॉप : 
या काळात बहुतेक लोकं वर्क फ्रॉम होम आहेत आणि जास्त करून लोकं लॅपटॉपचा वापर करीत आहेत. पण त्याचा स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत नाही. जर का आपणं देखील अशी चूक करत असाल, तर लवकरच या चुकीची दुरुस्ती करा, आणि काम करण्याचा आधी लॅपटॉप स्वच्छ करायला विसरू नका.