मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: रविवार, 29 मार्च 2020 (20:02 IST)

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या हाताळणाऱ्या सर्व गोष्टींना स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यातील महत्त्वाचा घटक आहे आपला मोबाइल. हे देखील बॅक्टेरिया आणि व्हायरसचे घर असू शकते. कोरोनाच्या दुष्प्रभावापासून बचाव करण्यासाठी आपल्या मोबाइलला स्वच्छ करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे ह्या गोष्टी- 
 
* मोबाइलला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ आणि मऊ कापड्याचे वापर करावे.
* निर्जंतुक नाशक द्रव्याने पुसल्यानंतर पेपरच्या रुमालाचा वापर करावा.
* निर्जंतुक नाशक द्रव्याचा वापर करावा किंवा आयसोप्रोपिल अल्कोहलाचा वापर देखील करू शकता.
* आपला फोन स्वच्छ केल्यानंतर आपले हात स्वच्छ साबणाने धुऊन घ्यावे
* मोबाइल स्वच्छ करताना हातात ग्लवज घालावे.
* मोबाइलला स्वच्छ करताना फोनला कुठल्याही द्रव्यामध्ये टाकू नये.
* मोबाइलला स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही अल्कोहलचा वापर करू नये.
* मोबाइलला स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू नये.
* मोबाइलला स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही प्रकाराचे ब्लीच वापरू नये.
* मोबाइलला स्वच्छ करण्यासाठी स्प्रे क्लीनर वापरू नये.