रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2019 (18:12 IST)

किचन स्वच्छ ठेवण्यासाठी ....

घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही महिला तर दिवसातील अधिकाधिक वेळ किचन साफ करण्यातच घालवतात. दिवसातील त्यांचा बराचसा वेळ किचनमध्येच जातो. किचनमध्येच त्या घरात राहणार्‍या लोकांचे स्वास्थ्य अवलंबून असते. किचन साफ ठेवणे गरजेचे असते कारण किचन साफ ठेवले नाही तर घरातील व्यक्ती आजारी पडू शकतात. मात्र सगळ्यात कठीण काम असते ते म्हणजे किचन साफ ठेवणे. कारण आपण सतत किचनमध्ये वावरत असल्याने ते तितकेच खराब होत असते.
 
स्वच्छ किचन कोणाला आवडत नाही मात्र प्रश्र्न असा आहे की किचन साफ कसे ठेवणार. तुम्हाला माहीत आहे का किचन साफ करण्याची पद्धत असते. अनेक महिला अशा असतात ज्यांना जेवण बनवताना किचन साफ ठेवण्याची सवय असते. मात्र काही महिला अशा असतात ज्या जेवण बनवताना सगळीकडे पसारा करून ठेवतात. आम्ही सांगत आहोत अशाकाही टिप्स ज्या तुम्हाला किचनमध्ये साफसफाई ठेवण्यास मदत करतील.
 
किचनच्या टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्क्रबरला साबण लावून त्याने भिंती धुवा. टाईल्स स्वच्छ होतील. टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच, अमोनिया, बेकिंग सोडा तसेच व्हिनेगारचाही वापर करू शकता.
 
सिंक साफ करण्यासाठी आणि त्यात ग्रीस चिकटले असल्यास त्यात गरम पाणी टाका. यात तुम्ही व्हिनेगार आणि बेकिंग सोडा टाका. सिंक नव्यासारखे चमकू लागेल.
 
किचनध्ये ठेवला जाणारा कचर्‍याचा डबा नेहमी स्वच्छ ठेवा. त्यातील पिशवी दररोज बदला. 
 
फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या. त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका. या मिश्रणाने फ्रीज साफ करा. यामुळे फ्रीज साफ होईलच तसेच त्याच किटाणू राहणार नाहीत.
 
किचनचे कॅबिनेट्‌स साफ करण्यासाठी व्हिनेगार आणि लिक्विड सोपचा वापर करा. व्हिनेगार आणि लिक्विड  सोप एकत्रित करून घ्या. याने कॅबिनेट्‌स स्वच्छ करा. कॅबिनेट्‌स एकदम स्वच्छ दिसतील.