बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

स्वयंपाक शिकताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी ...

सध्या तरुण मुलींना स्वयंपाक शिकण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. काही जणींना आवडही नसते. पण विवाहानंतर स्वयंपाक शिकावाच लागतो. अशा नवख्या मुलींनी स्वयंपाकाची सुरुवात करताना काही बाबी ध्यानात घ्याव्यात. 
 
स्वयंपाक करताना योग्य आकाराचं भांड निवडणं गरजेचं आहे. पदार्थ योग्य प्रमाणात शिजण्यासाठी, परतण्यासाठी योग्य आकाराचं भांड महत्त्वाचं ठरतं. 
 
सुरुवातीला थोड्या प्रमाणात अन्न शिजवावं. तिखट- मसाल्याचा अंदाज आल्यानंतर जास्त प्रमाणात अन्न शिजवायला हरकत नाही. 
 
पदार्थ बनवताना अधिक प्रमाणात पाण्याचा वापर टाळावा. कणीक भिजवणे, ग्रेव्ही तयार करणे, पातळ भाज्या करणे, रस्सा अथवा सांबार करतेवेळी पाणी जास्त झाल्यास पदार्थ बेचव बनतो. 
 
पदार्थ प्रमाणात शिजणंही गरजेचं आहे. शिवाय ठरावीक तापमान असणं गरजेचं आहे. मंद आचेवर शिजलेले पदार्थ रुचकर लागतात. भाज्या शिजवल्यानंतरचं पाणी स्टॉक म्हणून वापरावं.