शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

तल्लख मेंदूसाठी हे 5 खाद्य पदार्थ जादू करतील

हल्ली जंक फूड कडे सर्वाचा कळ बघता शरीराला पोषक तत्त्वांची कमी भासू लागते. या कारणामुळेच शारीरिक आणि मानसिक विकासावर प्रभाव पडतो. लठ्ठपणा, आजार अशा अनेक समस्या दिसू लागतात. अशात वयस्कर असो वा मुलं सगळ्यांना अशा आहाराची गरज आहे ज्याने मेंदूचं आरोग्य सुधारेल. मेमरी वाढवण्यासाठी आज आम्ही आपल्याला असे 5 खाद्य पदार्थ सांगत आहो ज्यामुळे मेंदू तंदुरुस्त राहील.
 
अंडी
प्रोटीनने भरपूर अंडी केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर मेंदूच्या विकासासाठी एक समृद्ध स्रोत आहे. अंडीत कोलीन नाम पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात आढळतं. ज्याने मेंदूचा विकास होतो. वेगवेगळ्या रेसिपीद्वारे अंड्याचं सेवन करता येऊ शकतं. बॉईल एग, दुधात कच्चं अंडं, सलॅड, ऑम्लेट, हाफ- फ्राय किंवा सँडविचमध्ये अंड्याची स्लाइस घालून देखील याचे सेवन करणे उत्तम ठरेल.
 
हळद
अॅटीऑक्सीडेंट आणि अॅटीइंफ्लेमेटरी गुणांनी भरपूर हळद मुलांच्या मानसिक शक्तीत सुधारासाठी उपयुक्त खाद्य पदार्थांपैकी एक आहे. हळदीच आढळणारे करक्यूमिन नामक तत्त्व मस्तिष्कातील तांत्रिकांमध्ये होणार्‍या सुजांविरुद्ध लढा देतात आणि अल्झाइमर सारख्या आजारांना लढा देण्यासाठी मजबूत करतं, ज्यामुळे मेंदूचा विकास जलद गतीने होत आणि बुद्धी शार्प होते.
 
हिरव्या भाज्या
भाज्या म्हटलं की लहान काय मोठे देखील तोंडं मुरगळू लागतात. परंतू हिरव्या पाले-भाज्या व्हिटॅमिन्सने भरपूर असतात. मेंदूच्या विकासासाठी भाज्या अत्यंत आवश्यक असल्याचे आढळतं. म्हणून आहारात अधिक प्रमाणात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. तसेच हिरव्या भाज्या मेंदू व्यतिरिक्त शरीरातील इतर अवयवांसाठी देखील फायदेशीर ठरतात.
 
दूध
दूध संपूर्ण आहार असल्याचं म्हटलं जातं. दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळतं जे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर आहे. दूध पिण्याने मुलांची हाडे मजबूत होतात आणि मेंदूचा विकास देखील होतो. म्हणून दररोज एक ग्लास दुधाचे सेवन अवश्य करावे.
 
दही
दूध न आवणार्‍यांसाठी दही देखील एक उत्तम पर्याय आहे. दह्यात दुधापेक्षा अधिक कॅल्शियम आढळतं आणि पचन देखील सुरळीत होतं. दही व्हिटॅमिन बी आणि प्रोटिनाचं एक योग्य स्रोत आहे. याने मेंदू क्रियाकलाप जलद आणि विकासात सुधार शक्य आहे.