मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चाऊमीन खाल्ल्याने तीन वर्षाच्या मुलाचे फुफ्फुस फाटले

रस्त्याच्या कडेला विकलं जाणारं चाइनीज फूड प्राणघातक ठरु शकतं. हरियाणा येथे चायनीज फूड स्टॉलवरील चाऊमीन खाल्ल्याने येथील तीन वर्षांच्या उस्मान नावाच्या मुलाची दोन्ही फुफ्फुसे फाटली आहेत. स्वच्छ वर्ण असलेला उस्मानचं शरीर अचानक संपूर्ण काळा पडलं. हे बघून कुटुंबीय त्याला दवाखान्यात घेऊन गेले. उस्मानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांती तो अखेर बचावलेला आहे. 
 
डॉक्टरांप्रमाणे चाऊमीनमध्ये चवीसाठी घालण्यात येणारे सॉसमधील अ‍ॅसिड हे आरोग्यासाठी इतके घातक ठरू शकते. उस्मानचे वडील मंजूर हसन यांनी सांगितले, की चाऊमीन खाल्ल्यानंतर लगेचच उस्मानची प्रकृती बिघडली. त्याला श्‍वास घ्यायलाही त्रास होत होता. खासगी दवाखान्यांनी उस्मानला दाखल करून घ्यायलाही नकार दिल्यानंतर गाबा रुग्णालयात त्याला आणण्यात आले. डॉ. निखिल बन्सल आणि डॉ. बी. एस. गाबा यांनी त्याला आयसीयूत दाखल केले आणि तातडीने उपचार केले. 
 
उस्मानची दोन्ही फुफ्फुसे फाटली आहेत. त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले असनू फुफ्फुसचे ऑपरेशन करुन चेस्ट ट्यूब घालण्यात आली आहे. उपचार सुरू असतानाच उस्मानला हृदयविकाराचा झटका देखील आला. 16 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेला उस्मान आता धोक्याबाहेर आहे.
 
किडनी आणि लिव्हरसाठी घातक
उस्मानवर उपचार करणार्‍या डॉक्टरांप्रमाणे चाऊमीन मध्ये स्वादासाठी धोकादायक अॅसिड वापरण्यात येतं. हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. हे केवळ फुफ्फुसांनाच नव्हे, तर किडनी आणि लिव्हरलाही घातक आहे.
 
हे चिनी खाद्य आहे. भारतात ते अलीकडच्या काळात कमालीचे लोकप्रिय बनलेले आहे. चाऊमीनमध्ये अ‍ॅसिड घातले जाते आणि ही केवळ फुफ्फुसांनाच नव्हे, तर किडनी आणि लिव्हरलाही घातक आहे.