मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (10:08 IST)

लालु प्रसाद यादवला मोठा धक्का बेहीशिबी मालमत्ता होणार जप्त

चारा घोटाळ्यात मुख्य सूत्रधार व तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाने त्यांची सर्व बेहिशेबी संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे लालूंचा पाटणा विमानतळाजवळचा बंगला , नोटाबंदीच्या काळात बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यांवर सरकारची टाच येणार आहे.
 
पाटणा विमानतळाजवळ फेयर ग्रो प्रायव्हेट लिमिटेडचा बंगला असून, बाजारभावानुसार बंगल्याची किंमत जवळपास साडेतीन कोटी आहे. फेयर ग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तेजप्रताप यादव, तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांच्या दोन मुली संचालकपदावर होत्या. चौकशीदरम्यान ही कंपनी बोगस असल्याचे उघड झाले आहे. आयकर विभागाने मागच्यावर्षी केलेल्या कारवाईत बंगला सील केला, तर नोटाबंदीच्या काळात लालू प्रसाद यादव यांच्याकडून अवामी बँकेत मजूरांच्या नावाने खाती उघडून लाखो रुपये जमा करण्यात आले होते. ते देखील उघड झाले असून त्यावर देखील कारवाई होणार आहे.