शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (10:47 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मल्याळम भाषेत आहे. 
 
या घटनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ जून रोजी केरळमधील गुरूवायूर मंदिराला भेट दिली होती. त्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजेच ७ जून रोजी हा धमकीचा संदेश मिळाला. मालदीव दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान या मंदिरात भेटीसाठी गेले होते. धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी मिळाल्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने याला गंभीरतेने घेत याची सर्व माहिती सुरक्षा संस्थेला दिली आहे.