शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सनी देओल यांची खासदारकी धोक्यात

Sunny Deol threaten membership of parliament
पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले अभिनेता-राजकारणी सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. कारण, निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली असून प्रचारादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
 
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी ७० लाख रुपये इतकीच रक्कम खर्च करण्याची मर्यादा असताना सनी देओल यांनी ८६ लाख रुपये खर्च केले होते. याप्रकरणी देओल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती. अशा वेळी निवडणूक आयोग संबंधीत व्यक्तीची खासदारकी रद्द करून त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराला विजयी घोषीत करु शकते.