शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भाजपचे पहिले कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याबद्दल 5 खास गोष्टी

नवी दिल्ली - वरिष्ठ भाजप नेते जेपी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. मोदी सरकारात गृहमंत्र्याचा पदभार सांभळत असलेले अमित शहा यांची व्यवस्तता बघत ही महत्त्वाची जबावदारी नड्डा यांना सोपवण्यात आली आहे. 
 
केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमित शहा हे भाजपाचे अध्यक्षपद सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अमित शहा यांना भाजपाच्या अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली. 
 
नड्डा यांच्याबद्दल 5 खास गोष्टी
 
जेपी नड्डा भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राहिलेले आहे. नड्डा यांची संघटनावर चांगली पकड असून ते मोदी आणि अमित शहा यांचे विश्वस्त आहे.
 
उत्तर प्रदेशातील 80 पैकी 62 जागा जिंकून देण्यात नड्डा यांचा मोठा वाटा आहे. 
 
ते रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक असून, अभाविपमध्येही ते सक्रिय होते. 
 
अमित शहा यांच्याप्रमाणेच नड्डा यांना निवडणूक प्रंबधनाची रणनीती तयार करण्याचा उत्तम अनुभव असल्याचा मानले जाते. ते खूप लो प्रोफाइल राहतात.
 
आयुष्मान भारत योजनेच्या यशाचं श्रेय नड्डा यांना दिलं जातं.