शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पोटातून काढण्यात आल्या किल्ल्या, नेलकटर, शिक्के आणि अंगठीसह 50 विचित्र वस्तू

उदयपुर- येथे एमबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देखील तेव्हा हैराण झाले जेव्हा एका तरुणाच्या पोटाची सर्जरी केल्यावर त्यातून 50 प्रकाराच्या वस्तू निघाल्या. बातमीप्रमाणे येथे 24 वर्षीय गजेंद्र नावाच्या तरुणाची पोटाची सर्जरी केली गेली तर त्याच्या पोटातून किल्ल्या, नेलकटर, शिक्के, चिल्माचे तुकडे, लाकडीचं माळ, अंगठी, पिन, क्लिपांसह 50 वस्तू काढण्यात आल्या. ऑपरेशननंतर आता तरुण स्वस्थ आहे.
 
सर्जरी करणार्‍या डॉक्टरांप्रमाणे गजेंद्राला नशा करण्याची सवय होती. दारू, चिल्म सारखे अनेक नशे करत असताना बहुतेक तो अशा वस्तू गिळून घेत असावा. 15 दिवसांपूर्वी पोटदुखी, उलट्या, आणि जेवण मिळत नसल्याने परेशान तरुण रुग्णालयात पोहचला तर एक्सरे मध्ये या सर्व वस्तू दिसल्या.
 
सीटी स्कॅन केल्यानंतर पोटात अनेक वस्तू दिसल्या. एंडोस्कोपी नंतर त्याची सर्जरी केली गेली. गजेंद्रवर 90 मिनिट ऑपरेशन करण्यात आलं. सर्जरी करणार्‍या डॉक्टरांप्रमाणे अनेक वस्तू तरुणाच्या अमाशय आणि काही मोठ्या आतड्यात सापडल्या.
 
या कारणामुळेच गजेंद्रला अल्सर देखील झाले आहे. डॉक्टरांप्रमाणे तो मानसिक रूपाने आजारी आहे. आश्चर्य म्हणजे त्याने टोकदार वस्तू देखील गिळून घेतल्या.