शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुजरात किनाऱ्यावर धडकणार वायू

'वायू' चक्रीवादळ गुजरातला धडणकणार होतं, वादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. यामुळे 'वायू' चक्रीवादळाचा धक्का थेट गुजरातला बसणार नाही तरी समुद्र किनाऱ्यावर मात्र परिणाम दिसून येणार आहे. 
 
गुजरातच्या समुद्रकिनार्‍यावर एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असून हाय अलर्ट जारी केले गेले आहेत. याचा प्रभावामुळे दोन दिवस कोकण आणि गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून लोकांना समुद्री किनार्‍यावर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. मच्छिमारांना देखील सतर्कचा इशारा केला गेला आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे. कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.  
 
 ‘वायू’ वादळ धडकणार असल्याच्या अंदाज असल्याने समुद्र किनार्‍यावरील 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच सौराष्ट्र आणि कच्छमधील बंदरे व विमानतळ बंद करण्यात आली आहेत. रुग्णालय आणि इमरजेंसी सेवा 24 तासांसाठी सज्ज करण्यात आले आहे. युद्धनौका व नौदलाची विमानेही तयार ठेवली आहेत. 
 
वादळाचा धोका बघत मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही धावणार नाहीत. तसेच एकूण 70 ट्रेन निरस्त केल्या गेल्या आहेत.
 
समुद्र किनाऱ्याला उधाण आलं असून परिसरात साधारण ताशी 155 ते 165 किमी वेगानं वारे वाहात आहेत. चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आले असून किनारी भागात सोसाट्याचा वारे वाहत आहे.  गुजरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस येणार आहे.