आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार : संजय राऊत
'आदित्य ठाकरे पाच वर्षं मुख्यमंत्री राहतील, आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार,' असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवारांना बोलण्याचा अधिकार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याआधी निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली होती.
आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादरच्या सेनाभवनात बैठक घेतली होती. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे याआधीच दर्शवली आहे.