बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2019 (17:13 IST)

नाशिकमध्ये धाडसी दरोडा, मुथूट फायनान्सचा कर्मचारी ठार

नाशिकच्या उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलजवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचारी ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. 
 
मुथूट फायनान्सचे कार्यालय उघडल्यानंतर चार दरोडेखोर आत घुसले. मॅनेजर आणि वॉचमनसह चौघांवर दरोडेखोरांनी गोळीबार करत लाखो रूपयांचा मुद्देमाल लुटून नेण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीन गोळ्या लागल्याने एका कर्मचार्‍याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शाजू सॅम्युल (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. तर चंद्रशेखर देशपांडे, कैलास जैन अशी जखमींचे नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
 
दरम्यान, दरोड्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लूट झाली नसल्याचे सांगितले.