काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीत वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवाण्यास मुंजरी दिली आहे. हा निर्णय येत्या 3 जुलैपासून लागू होईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू काश्मीरमध्ये केंद्र शासनाच्या विस्ताराला मंजूरी दिली गेली. राज्यात 20 जून 2018 पासून लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीची मुदत 2 जुलै 2019 रोजी संपत असून राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांनी वाढवण्याची शिफारस केली होती.
सूत्रांप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणाऱ्या घोषणापत्रावर हस्ताक्षर करतील जे 3 जुलैपासून लागू होणार आहे.