गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कोलकातामध्ये माजी मिस इंडियासोबत गैरवर्तन, फेसबुकवर पोस्ट केली वेदना

कोलकाता- मॉडल आणि अभिनेत्री उशोशी सेनगुप्ता यांनी आरोप केला आहे की कामाहून घरी परत येताना काही अज्ञात शरारती तत्त्वांनी जवाहरलाल रोड क्रॉसिंगजवळहून तिचा पिच्छा केला आणि तिच्यासोबत अभद्र व्यवहार केला. उशोशी हिने 2010 मध्ये मिस इंडिया युनिव्हर्स शीर्षक मिळवले होते.
 
पोलिसांनी या घटनेत सात लोकांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटाच्या सुमारास घडली. सेनगुप्ता द्वारे घेतलेले फोटोज आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अटक करण्यात आली आहे.
 
सेनगुप्ताने दावा केला आहे की ती एका अॅप बेस्ड कॅबने आपल्या सहकर्मचार्‍यासोबत घर जात होती. या दरम्यान त्यांच्या कारला बाइक चालवत असलेल्या तरुणांनी टक्कर दिली आणि ते कार ड्राइवरला बाहेर काढून मारहाण करू लागले.
 
उशोशीने या प्रकरणाची फेसबुक पोस्ट देखील शेअर केली आहे. सोबतच कारच्या फुटलेल्या काचेचा फोटो देखील आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
फेसबुक पोस्टात उशोशीने सांगितले की रात्री आपल्या कलीगसह घर जात असताना हेल्मेट न लावलेले तरुण आले आणि उबरला धडकले. नंतर त्यांनी ड्राइवरवर आरडाओरड सुरू केली आणि त्याला बाहेर खेचून मारहाण करू लागले. उशोशीने सांगितले की ती जवळच्या पोलीस स्टेशनावर मदतीसाठी पोहचली तर पोलिसांनी स्वत:च्या क्षेत्रातातील घटना नसल्यामुळे सोबत येण्यास नकार दिला. नंतर घटनास्थळी पोलिस आल्यावर मुलाने त्याला धक्का दिला आणि पळ काढला. 
 
उशोशीने आपल्या पोस्टामध्ये सांगितले की कशा प्रकारे तक्रार दाखल करताना पोलिस त्यांना कायद्याचे पाठ देत होती आणि ड्राइवरची तक्रार दाखल करण्यात देखील नाकारले. 
 
यावर कोलकाता पोलिसांनी ट्विट करत लिहिले की आम्ही ही घटना गंभीरतेने बघत असून आतापर्यंत या प्रकरणात सात लोकांना अटक केली गेली आहे.