1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Malaika gave the confession of the relationship

मलायकाने दिली नात्याची कबुली

बॉलिवूडध्ये कधी कोणाचे नाते जुळेल आणि कधी कोणाचे प्रेम भंग होईल हे काही सांगता येत नाही. सध्या अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्यातील नाते बहरताना दिसत आहे. 
 
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शो मध्ये बॉलिवूड मंडळींच्या नात्यांबद्दल अनेक उलगडे होत असतात. नुकताच अभिनेत्री प्रियंका चोप्राने एक खुलासा केला आहे. अर्जुन आणि मलायका एकेकांना डेट करत असल्याचे तिने सांगितले. एका कार्यक्रमात बोलत असताना मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या नात्याला कबुली दिली. 
 
या कार्यक्राचा छोटा भाग ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात किरण खैर, वीर दास, मलायका अरोरा आणि मलायका दुआ उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मलायकाने एक वक्तव्य केले. ती म्हणाली, मला अर्जुन आवडतो या मार्गाने किंवा त्या मार्गाने. अर्जुन कपूर सध्या त्याच्या 'संदीप और पिंकी फरार', 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' आणि 'पानिपत' सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 
 
'पानिपत' सिनेमामध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. तर दुसरीकडे मलायका तिच्याफॅशन शोमध्ये व्यग्र आहे.
 
पुढील लेख
अभिनय करतोय का हेमलला डेट?