झोमॅटो 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा देणार
ऑनलाईन फूड कंपनी झोमॅटोने कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पॅरेंटल पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. झोमॅटोचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी ब्लॉग लिहून याबाबतची माहिती दिली.
“कुटुंबाचा सांभाळ करता यावा यासाठी नव्याने पालक होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी 1,000 डॉलरचा (जवळपास 69,262 रुपये) मदत निधी देणार आहे, जेणेकरुन ते त्यांच्या बाळाचं या जगात स्वागत करु शकतील”, असं दीपेंद्र गोयल यांनी म्हटलं.
सरकारच्या नियमांनुसार, आम्ही जगभरात आमच्या महिला कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा देत आहोत. पुरुष कर्मचाऱ्यांनाही ही सुविध देण्यात येईल. ही सुविधा केवळ बाळाला जन्म देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर सेरोगसी, दत्तक घेणे किंवा समलिंगी जोडप्यांनाही लागू होईल असे म्हटले आहे.