गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

लहान दुकानदार आणि उद्योजकांना मिळणार 3,000 रुपये महिना पेंशन, जाणून घ्या फायदेशीर स्कीम

मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत अनेक मोठ्या निर्णय घेतले गेले आहे. यात एका लहान व्यवसायीला पेंशन देण्याची स्कीम देखील आहे. लहान दुकानदार आणि उद्योजकांसाठी नवीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर लहान व्यवसायींना किमान 3,000 रुपये महिना पेंशन मिळेल. 
 
ते सर्व व्यवसायी ज्यांचे जीएसटी अंतर्गत वार्षिक टर्नओव्हर 1.5 कोटीहून कमी आहे, या योजनेचा लाभ घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवडणूक वचनपत्रात दिलेले हे वचन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मोदी 2.0 च्या या योजनेचा लाभ देशातील तीन कोटीहून अधिक किरकोळ व्यापारी आणि दुकानदार व स्वरोजगार करणार्‍या लोकांना मिळणार आहे.
 
पुढील तीन वर्षात सुमारे पाच कोटी दुकानदार या योजनेत जुळतील अशी उमेद केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे.
 
व्यवसायी पेंशन योजना म्हणजे काय?
 
व्यवसायी पेंशन योजना- केंद्रीय कॅबिनेटने लहान व्यवसायींसाठी नवीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू करायला मंजुरी दिली आहे ज्या अंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर लहान व्यवसायी किमान 3,000 रुपये मासिक पेंशनसाठी पात्र असतील.
 
जीएसटी अंतर्गत वार्षिक टर्नओव्हर दीड कोटीहून कमी असल्यास योजनेचा लाभ मिळू शकेल. 60 वर्षाच्या वयानंतर व्यवसायी किंवा कुटुंबाला पेंशन मिळू शकेल. लहान दुकानदार, स्वरोजगार करणारे आणि किरकोळ व्यवसायी ज्यांचे वय 18 ते 40 वर्ष वयोगटातील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वर्ष वय असलेले व्ययसायींना स्वत:ला पंजीकृत करावे लागेल. योजनेचा लाभ उचलण्यासाठी व्यवसायीला स्वत:कडून काही राशी जमा करावी लागेल आणि तेवढीच राशी सरकारकडून व्यवसायीच्या खात्यात जमा करण्यात येईल.
 
येथे करा आवेदन
व्यवसायी यासाठी देशभरात पसरलेले 3.25 लाख कॉमन सर्व्हिस केंद्राद्वारे स्वत:ला पंजीकृत करवू शकतील. योजना अंतर्गत तीन वर्षात जगभरातून सुमारे 5 कोटी व्यवसायी पंजीकृत केले जातील.