मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

25 वर्ष इमानदारीने नोकरी केल्याचा इनाम, ‘मर्सिडीज’

आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देऊन खूश करणारे गुजरातचे नामांकित हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी यावेळी कंपनीत 25 वर्ष इमानदारीने नोकरी केल्याबदद्ल तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेंझ कार भेट म्हणून दिल्या आहेत.
 
ढोलकीया यांनी निलेश जाडा (40) मुकेश चांदपारा (38) आणि महेश चांदपारा (43) या तीन कर्मचाऱ्यांना हे महागडे गिफ्ट दिले आहे. या प्रत्येक कारची किंमत एक कोटी एवढी आहे. याबद्दल बोलताना ढोलकिया म्हणाले की हे जेव्हा कंपनीत कामाला आले तेव्हा ते अवघे 13 ते 15 वर्षांचे होते. सुरुवातीला ते डायमंड कटिंग आणि पॉलिशचे काम करायचे. आता वरिष्ठ आणि विश्वासू कर्मचाऱ्यांमध्ये यांचा समावेश आहे.
 
त्यांनी याआधी दिवाळीचा बोनस म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना फ्लॅट व कार दिल्या होत्या.