सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

युपीच्या पोलिसांचा प्रताप, अॅपल कंपनीच्या मॅॅनेजरची गोळी मारून हत्या

पाच वर्षाच्या मुलाला आरोपी म्हणून अटक केली हा प्रताप ताजा असतांना उत्तर प्रदेश पोलिसांनी कोणतीही चूक नसतांना लखनौमध्ये पोलिसाने केलेल्या गोळीबारात अॅपल कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाचा मृत्यू झालाय. त्यांचे नाव विवेक तिवारी असे  आहे.

आपली सहयोगी महिला आणि  विवेक सहकाऱ्यासोबत गाडीमधून घरी परतत होते. रस्त्यात  पोलीस हवालदाराने त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र विवेकने दुर्लक्ष करत गाडी पुढे नेली होती. यामुळे त्यांना  संशयित समजून हवालदाराने गाडीवर गोळीबार केला. यात विवेक यांना गोळी लागली. तर त्यांच्यासोबत असलेली महिलाही जखमी झाली आहे. त्यानंतर विवेक यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हा इतका गंभीर प्रकार असून त्याबाबत  विवेक यांची पत्नी कल्पनाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली असून मृतदेह ताब्यात घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. तर यामुळे पुन्हा युपी पोलिस अडचणीत सापडले आहे.