शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गणेशोत्सवात दारू पिली तर ११ दिवस पोलीस कोठडी

गणेशोत्सवाच्या आनंदात काही उत्साही कार्यकर्ते आगमन आणि विसर्जनाच्यावेळी दारू पिऊन धिंगाणा घालतात. अशा कार्यकर्त्यांना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी इशारा दिला आहे. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये दारू प्याल तर ११ दिवस पोलीस कोठडी होईल असं गिरीश बापट म्हणाले आहेत. पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात बोलत असताना बापट यांनी हे विधान केले आहे.
 
पुण्यातील बहुतांश मंडळे गणेशोत्सवाच्या काळात जनजागृतीपर संदेश देण्यासाठी उभारलेल्या देखाव्यांतून सामाजिक भावना जपतात. अनेक मंडळं अशी आहेत जी गरजूंना सढळ हस्ते मदत करीत असतात. काही मंडळे आरोग्यासाठी, स्वच्छतेचे, वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवित असतात. मात्र काही कार्यकर्ते असे असतात जे श्री गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या वेळी दारू पिऊन धिंगाणा घालतात. अशा मूठभर कार्यकर्त्यांमुळे त्यामुळे उत्सवाला आणि मंडळाच्या प्रतिमेला गालबोट लागते. याचे भान प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे असे आवाहन बापट यांनी केले आहे. हे भान न राखणाऱ्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागेल असे सांगितले आहे.