गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलाचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलगा बंडारू वैष्णव (२१)  याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल आहे. तो एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकत होता. रात्रीच्या जेवणानंतर वैष्णवच्या छातीत दुखायला लागलं. त्यानंतर वैष्णवला 
 
सिकंदराबादच्या गुरु नानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला.
 
बंडारू दत्तात्रय तेलंगणातील सिकंदराबादचे खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांनी 2014 पासून ते 1 सप्टेंबर 2017 पर्यंत कामगार मंत्रीपद सांभाळलं आहे. दक्षिण भारतातील राजकारण त्यांची एक वेगळी ओळख आहे. ते अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्येही मंत्री होते.