मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 29 सप्टेंबर 2018 (16:44 IST)

तांत्रिकाच्या सूचनेवरून पतीसह घरातील इतर पुरुषांनी केला नवविवाहीतेवर बलात्कार

संतापजनक प्रकार घडला असून लग्नाच्या पहिल्या रात्री एका तरुणीवर तिच्या नवऱ्यासहीत घरातील सर्व पुरुषांनी सोबतच चार तांत्रिकांनी बलात्कार केला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार हरयाणातील कुरुक्षेत्र येथे घडला. 
 
चार तांत्रिकांनीच घरातील पुरुषांना महिलेवर बलात्कार करण्यास सांगितले आहे. मुलीच्या वडिलांनी प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली. मात्र अजून तरी कोणी ताब्यात घेतले गेले नाही. यात पीडित तरुणीचे १२ सप्टेंबर रोजी लग्न झाले. 
 
धार्मिक  विधी पूर्ण झाल्यावर १३ सप्टेंबरला तरुणीला व तिच्या नवऱ्याला एका खोलीत पाठविण्यात आले. मात्र काही वेळाने त्या खोलीत तरुणीचा सासरा आला त्याने जबरदस्ती तरुणीला शीतपेय प्यायला दिले. त्यानंतर ती तरुणी बेशुद्ध अवस्थेत गेली, रात्रभर त्या तरुणीच्या सासऱ्याने, नवऱ्याने, दिराने, नंणदेच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. मात्र हा प्रकार उघड होताच दुसऱ्या दिवशी जेव्हा तरुणी तेथून पळून जाऊ लागली तेव्हा तिच्या सासू व नणंदेने तिला मारहाण करून खोलीत बंद केले. त्या रात्री तरुणीच्या सासरी येणाऱ्या चार तांत्रिकांनी देखील तिच्यावर बलात्कार केला आहे.
 
घरात कुणी नाही हे बघून ती तरुणी तेथून पळून गेली व तिच्या माहेरी आली. तिने वडिलांना तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कथन केला. सासरची मंडळी तसेच चार तांत्रिकांविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमागे काही तंत्रविद्या, काळ्या जादूचा संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हा प्रकार घडल्याने हरियाना मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.