गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

...मग प्रेयसीच्या नावाने करावी लागणार FD

runway couple
पळून लग्न करणारे कोणतेही नियम पाळत नसले तरी आता त्यांना हा नियम नक्कीच पाळवा लागणार आहे. मुलीला पळवून नेणार्‍या मुलाला आता तिच्या नावावर बँकेत 50 हजार ते 3 लाख रुपये पर्यंतची रक्कम जमा करवावी लागेल. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने असे निर्देश दिले आहेत. 
 
घरातून पळून लग्नासाठी पोलिस सुरक्षेची मागणी करणार्‍यांना जोडप्यांना हायकोर्टाने म्हटले आहे की मुलाला आधी मुलीच्या बँक खात्यात एक ठराविक राशी जमा करावी लागेल. ही रक्कम 50 हजार ते 3 लाख रुपये पर्यंत असू शकते. ही रक्कम एक महिन्याच्या आत तीन वर्षासाठी जमा करवावी लागेल.
 
येथे दररोज सुमारे 20 ते 30 जोडपे कुटुंबाविरुद्ध पळून लग्न करतात, त्यातून अनेक जोडपे सुरक्षेसाठी कोर्टाची पायरी चढतात. अशा प्रकरणांमध्ये हे जोडपे जीवाला धोका असल्यामुळे पोलिस सुरक्षेची मागणी करतात.