मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (09:27 IST)

जयपूरच्या एसएमएस रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग, ८ रुग्णांचा मृत्यू

जयपूर एसएमएस हॉस्पिटलला आग
जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने ८ रुग्णांचा मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रशासनाने चौकशीसाठी एक पथक तयार केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयपूरमधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या सवाई मान सिंह हॉस्पिटल (एसएमएस) मध्ये रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली, त्यावेळी ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयू वॉर्ड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीचे कारण सुरुवातीला शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.  

अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयाच्या संकुलात घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या सुमारे एक डझन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.  
घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांना सर्व शक्य ती मदत आणि त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.  
Edited By- Dhanashri Naik