बापाच्या सांगण्यावरुन काकाने केल्या तीन लहान पुतण्याच्या हत्या
कुरुक्षेत्र परिसर तीन लहान मुलांच्या हत्येने ह्दरला आहे. यामध्ये पंचकुला जंगल परिसरात तीन चिमूकल्यांच्या हत्यां झाल्याचे उघड झाले आहे. या हत्या झालेल्या मृत चिमूकल्यांमध्ये 2 मुले, एका मुलीचा समावेश आहे. यात विशेष असे की स्वतः बापाच्या सांगण्यावरूनच काकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात सारसा गावातील तीन मुले अचानक बेपत्ता झाली. मुलांचा शोध घेतला असता चिमूकल्यांचे मृतदेह जंगलात आढळले. यामध्ये समीर (11), सिमरन (7) आणि समर (6) ही नावे आहेत. या लहान बालकांची हत्या त्यांच्या सख्या काकाने त्यांचा भाऊ अर्थात मुलांचा बाप त्याच्या सांगण्यावरून केला आहे.पोलिसांनी दिलेल्या महिती नुसार या लहान मुलांची हत्या बाप सोनू मलिक , काका जगदीप मलिकने केली आहे. या सर्व हत्या अनैतिक संबंधातून झाल्या आहेत. बाप सोनू मलिक याचे अन्य एका महिलेशी अनैतीक संबंध होते.त्यातून त्या महिलेस अपत्येही झाली आहत. त्यातूनच ही हत्या झाल्याचे समोर आले आहेत. पोलिस सर्व पुरावे जमवत असून चौकशी सुरु केली आहे.